free page hit counter

भारताचे चंद्रयान -3 विक्रम लॅन्डरचे यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग

भारताचे चंद्रयान -3 विक्रम लॅन्डरचे यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग

Spread the love

भारताची चांद्रयान -3 मोहीम ही यशस्वीरित्या पार पडली असून, चंद्रयान – तीन चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग झालेले आहे. आज 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी विक्रम लॅन्डर चे चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरण झाले.
संपूर्ण भारतासाठी ही ऐतिहासिक गोष्ट आहे. इस्त्रोचे अध्यक्ष ,शास्त्रज्ञ ,अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी ही मोहीम यशस्वी रित्या पार पडली आहे. इस्त्रोमार्फत पाऊण तास या संदर्भामध्ये लाईव्ह चालू होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेवरून सर्व भारतीयांचे तसेच इस्त्रोच्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 2019 मध्ये चांद्रयान -दोन चा अंतिम टप्प्यांमध्ये संपर्क तुटल्याने थोडी निराशा झाली होती परंतु चांद्रयान -तीन च्या यशस्वीरित्या लँडिंग ने ही कसर भरून काढली आहे.
चांद्रयान मोहिमेमध्ये भारत हा चौथा यशस्वी देश असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. सर्व भारतीयांसाठी ही मोठी गर्वाची बाब असून आज ऐतिहासिक पर्वणीच घडली आहे. चांद्रयान तीन यशस्वी मोहिमेबद्दल इस्त्रो मधील सर्व अधिकाऱ्यांचे तसेच सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन.

(Aishwarya Bagal)

IMG-20230823-WA0268-1024x1024 भारताचे चंद्रयान -3 विक्रम लॅन्डरचे यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed