free page hit counter

ऑनलाईन लोन ऍप मदत कि मनस्ताप

ऑनलाईन लोन ऍप मदत कि मनस्ताप

पिंपरी :- आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार सर्वांच्या गरजा वाढल्या आहेत. इंटरनेटचा जमाना आहे सर्वांना आपल्याकडे ब्रँडेड गोष्टी असाव्या असा हव्यास वाटतो. अंथरून पाहून पाय पसरावे ही म्हण आता काळा नुसार पुसत गेली आहे. हौस भागवायची म्हटलं की पैसा आला आणि पैसा म्हटलं की पैसा म्हटलं की ते मिळवायचे पर्यायही आले.
सर्वसाधारण माणूस सामान्य माणूस हा कष्ट करून आपल्या नोकरी धंद्यातून कमाई करतो त्यातूनच बचत करतो पण कधी कधी काही गोष्टींसाठी अचानकपणे उद्भवलेल्या प्रसंगांसाठी मदत म्हणून त्याला कर्ज घ्यावे लागते. आता कर्जाची जुनी व्याख्या म्हणजे रीतसर बँकेत किंवा पतसंस्थेमध्ये जाऊन कागदपत्रे देऊन बँकेने ठरवलेल्या ठराविक पात्रता पद्धतीनुसार कर्ज मिळते.
आजकाल सगळ्याच गोष्टी खूप सोप्या झालेल्या आहेत सगळ्याच गोष्टी अगदी तत्परतेने मिळाव्या यासाठी मानवाचे प्रयत्न आहेत त्यामधीलच एक भाग म्हणजे हे “ऑनलाइन लोन ॲप” जशा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तशाच पद्धतीने या ऑनलाइन ॲप लोन प्रकरणाला ही दोन बाजू आहेत.
ऑनलाइन ॲप लोन घ्यायचे म्हणजे आधी ते ॲप तुमचा मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे लागते. डाउनलोड करतानाच ते ॲप तुमची पर्सनल माहिती तुमच्या मोबाईल मधील सर्व डाटा,फोटो,कॉन्टॅक्टस या सर्व गोष्टींचा एक्सेस मागतात व तुम्हाला तो द्यावाही लागतो त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रायव्हेट गोष्टींची माहिती या ऑनलाइन लोन ॲप कडे जाते.
आता ज्यावेळी आपल्याला खरोखरच काही गरज पडेल किंवा काही अर्जंट अडचण असेल त्यावेळी त्यामधून पैसे घेणे म्हणजे खरंच ही एक चांगली सुविधा आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याची परतफेड योग्य वेळी देऊ शकता. या ऑनलाइन लोन ॲपचा व्याजदरही बराच असतो तसेच त्यांचे आठवडा, पंधरा दिवस व महिना अशा पद्धतीने हप्ते असतात.
यामध्ये काही चांगले ॲप आहेत तर काही फसवणूक प्रकारातीलही ॲप आहेत. आता यातील चांगले अँप कोणते तर जे तुमच्या सिबिल रिपोर्ट ला रजिस्टर होतात.तुम्ही त्या ऑनलाईन ॲपवरून लोन घेतल्यास जर ते लोन तुमच्या सिबिल रिपोर्टला दाखवत असेल तर ते एक चांगल्या पद्धतीचे ऑनलाईन लोन ॲप आहे असे समजावे. ज्या कर्जाची परतफेड करणे तुम्हाला बंधनकारक असते.
आता यामधील फसवणुकीचा एक काळा प्रकार म्हणजे काही ॲप तुमच्या गरजेला मदत म्हणून तुम्हाला कर्ज देऊ करतात व कर्ज दिल्यानंतर काही कारणास्तव तुम्हाला ते परत करणे शक्य झाले नसल्यास तुमचा सर्व प्रायव्हेट डाटा ते वापरून तुम्हाला ब्लॅकमेल करायला चालू करतात तुम्ही जर पुरुष किंवा स्त्री असाल तर तुमच्या मोबाईल मधील काही पर्सनल फोटोंचा वापर करून ते एडिट करून ते इतरत्र पसरवण्याची धमकी देतात. तसेच जाती-धर्माविषयक काही असभ्य गोष्टींमध्ये तुमच्या फोटोचा वापर करून ते पसरवण्याची धमकी देतात. काही अश्लील फोटोज मध्ये तुमचा तुमच्या फोटोचा वापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडवून आणतात.
हे सर्व प्रकार तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींना हे फॉरवर्ड करण्याची ते धमकी देतात. सतत वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून नाहक त्रास देतात. यामुळे व्यक्तीची मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडून जाते. फक्त या धमक्यांमुळे लोकांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचललेले ही बातम्या येत आहेत.
त्यामुळे अत्यंत गरज असेल तरच आणि तुमची कर्ज वेळेवर परतफेड करू शकण्याची क्षमता असेल तरच या पर्यायाचा वापर करावा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा कायम घातकच असतो. या सर्व सुख सोयी आपल्या जीवनशैलीचा भाग सुखकर व्हावा, आनंदी व्हावा म्हणून असतो. पण या गोष्टींपासून जर आपल्याला नाहक मनस्ताप व नैराश्य यांना सामोरे जावे लागत असेल तर कुठेतरी या गोष्टींचा विचार होणे महत्त्वाचे आहे.
टीप -वरील माहिती ही आर्थिक तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तसेच सत्य अनुभवआलेल्या व्यक्तींसोबत चर्चा करून प्रसारित करण्यात येत आहे.

images-2023-08-20T182321.771-1 ऑनलाईन लोन ऍप मदत कि मनस्ताप

(ऐश्वर्या बागल – भडगावकर )

Share this content:

Post Comment

You May Have Missed