चिंचवड ५ ऑक्टोबर :मा. स्वीकृत नगरसेवक विठ्ठल बबन भोईर आणि सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या वतीने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ शनिवारी चिंचवडगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक संस्कृती आणि भक्तीभाव यांचा संगम घडविणाऱ्या या स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रास्ताविकात बोलताना मा. स्वीकृत नगरसेवक विठ्ठल भोईर म्हणाले, “आपल्या संस्कृतीतील उत्सव केवळ पूजेपुरते मर्यादित नसून ते सामाजिक एकतेचे आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांनी दाखवलेली कला, श्रद्धा आणि सहभाग अभिमानास्पद आहे. समाजातील एकोपा आणि सौहार्द वृद्धिंगत करण्यासाठी असे उपक्रम आम्ही पुढेही राबवत राहू.”
चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले, “विठ्ठल भोईर हे समाजाशी नाळ जपणारे, लोकसंग्रह करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा आणि जनसंपर्क पाहता ते लवकरच महापालिकेत निवडून जातील, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. समाजसेवेचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने संस्कार आणि श्रद्धेचा उत्सव आहे.”
चिंचवड विधानसभेच्या माजी आमदार आश्विनीताई जगताप यांनीही स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल विठ्ठल भोईर व पल्लवी भोईर यांचे कौतुक करत त्यांच्या काम व जनसंपर्क पाहता ते लवकरच महापालिकेत निवडून जातील, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. समाजसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. “सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जोपासत समाजाला एकत्र आणण्याचे काम विठ्ठल भोईर यांनी सातत्याने केले आहे. अशी भावनाप्रधान आणि लोकाभिमुख उपक्रमच समाजाला दिशा देतात,” असे त्या म्हणाल्या.

विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनीही आपल्या शुभेच्छा देताना सांगितले, “महिला सहभाग, सर्जनशीलता आणि समाजातील ऐक्य यांचा सुंदर संगम या स्पर्धेत दिसून आला.पल्लवी भोईर व विठ्ठल भोईर यांनी घेतलेली पुढाकार प्रशंसनीय आहे.”परीक्षक म्हणून नीता चोरडिया यांनी सजावटींचे मूल्यांकन केले.
निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला .
गणपती सजावट स्पर्धा विजेते:
प्रथम – प्रणाली बोरकर (राजस्थान, शिशमहल)
द्वितीय – प्रांजल धामणकर (गजानन गुफा)
तृतीय – श्रेया देशमुख (१२ ज्योतिर्लिंग)
चतुर्थ – पुनम गणेश इंगळे (जेजुरी गड देखावा)
पाचवा – तेजस्विनी भोसले (गंगा घाट देखावा)
गौरी सजावट स्पर्धा विजेते:
प्रथम – सुनिता अजित दहिफोडे (ऑपरेशन सिंदुर देखावा)
द्वितीय – रोहिणी महेश वाळेकर (शंकर-पार्वती स्वरूप / केदारनाथ देखावा)
तृतीय – सई पंकज देव (ब्युटी पार्लर देखावा)
चतुर्थ – रंजना तानाजी लांडगे (हरतालिका पूजा देखावा)
पाचवा – हेमलता शिवनारायण जाजू (ऑपरेशन सिंदुर देखावा) विजेत्यांना एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, पैठणी आणि इस्त्री अशी आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली तसेच सर्व स्पर्धकांना स्मृतिचिन्ह भेट देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य महेश कुलकर्णी, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस मधुकर बच्चे, सरचिटणीस वैशाली खाडये, भाजपा वरीष्ठ उपाध्यक्ष काळुराम बारणे, मा. नगरसेवक राजेंद्र गावडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, जयहिंद बँक संचालक राहुल भोईर, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, राष्ट्रवादी चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, ज्येष्ठ नेते रवींद्र देशपांडे, ज्येष्ठ नेते गतीराम भोईर, शेखर चिंचवडे, महिला मोर्चाच्या मा. अध्यक्षा उज्वला गावडे, योगेश चिंचवडे, रंजना चिंचवडे, रविंद्र प्रभुणे, शिवम डांगे, सचिन शिवले, वाल्मिक शिवले, सूरज भोईर, आरती सुक्रे, पल्लवी पाठक, नीता कुशारे आदी मान्यवर उपस्थित होते.
