वीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय मधील माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली माजी विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकावरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आपले वय पद प्रतिष्ठा कामाचा व्याप बाजूला ठेवून सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.


या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली नंतर मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले, माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे औक्षण केले आणि शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले . यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी आभार म्हणून शिक्षकांना भक्ती शक्तीचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या भेटीची मूर्ती व पुस्तक भेट दिली तसेच शाळेला फळा भेट दिला ही शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी सुंदर आठवण ठरली पुन्हा त्याच वर्गात वीस वर्षानंतर शाळा भरली काही शिक्षकांनी जुन्या दिवसाप्रमाणे शिक्षणाची गमतीशीर सत्र घेतली व हलक्या फुलक्या शिक्षाही दिल्या त्यामुळे सर्व वातावरण हास्यविनोदाने भरून गेले हा दिवस सर्वांसाठी अत्यंत भावनिक व प्रेरणादायी ठरला सर्वांनी अशीच भेट दरवर्षी व्हावी अशी इच्छाही व्यक्त केली. 20 वर्षानंतर भरलेल्या वर्गातून कुणाचेही घराकडे पाय निघत नव्हते. पण पुन्हा भेटण्याच्या आशेने पुन्हा शाळेची घंटा वाजली पुन्हा शाळा सुटली…..