मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून केशवनगर, चिंचवडगाव येथे आयोजित ४ दिवसीय मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
या शिबिराद्वारे ३५८ नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड प्राप्त करून ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली. देशभरातील नामांकित रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार, दाखल होण्यापूर्वी व नंतरच्या तपासण्या तसेच इतर सुविधा याबाबत नागरिकांना मार्गदर्शनही करण्यात आले.या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आरोग्य संरक्षणाचे कवच लाभले असून भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सौ.पल्लवी विठ्ठल भोईरसचिव – संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
श्री.विठ्ठल बबनराव भोईर-मा.स्विकृत नगर सदस्य ब प्रभाग समिती पिं.चिं.मनपा_प्रभाग / अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)
संस्थापक – अध्यक्ष-संकल्प नागरी पतसंस्था मर्यादित
Facebook -https://www.facebook.com/share/r/19iys3j97w/
