पिंपरी-चिंचवड: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘राजमुद्रा फाऊंडेशन’ च्या पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षपदी श्री. सतीश रसिक जारकड यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. फाऊंडेशनचे संस्थापक-संचालक मा. डॉ. मनोहर शिंदे व मा. सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. अमोल ठाकर यांच्या शिफारसीनुसार आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. समाधान तुकाराम इंगवले यांच्या अनुमोदनाने जारकड यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सतीश जारकड यांचा सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि जनसंपर्क विचारात घेऊन संस्थेच्या विस्तारासाठी ही निवड करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.शहरात संघटनात्मक बांधणीवर भर:या नियुक्तीनंतर बोलताना सतीश जारकड यांनी सांगितले की, “राजमुद्रा फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात विधायक सामाजिक उपक्रम राबविण्यावर माझा भर राहील. शहराच्या विविध प्रभागांमध्ये संघटनेची बांधणी करून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आम्ही करू.
“सदर नियुक्तीबद्दल शहरातून जारकड यांचे अभिनंदन होत आहे. फाऊंडेशनच्या ध्येय-धोरणांनुसार काम करत असताना शिस्त आणि पारदर्शकता जपण्याचे आवाहन केंद्रीय व्यवस्थापनाने केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




