पंढरपूर:सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘राजमुद्रा फाउंडेशन’ या संस्थेच्या पंढरपूर तालुका कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येत असून, श्री. दिपक आसबे यांची तालुका सहसचिव पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सामाजिक वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे.राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोहर शिंदे व सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वाची निवड करण्यात आली आहे. या निवडीला महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अमोल ठाकर यांनी अनुमोदन दिले असून, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. समाधान इंगवले यांच्या सूचनेवरून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.समाजसेवेचा वारसा:दीपक आसबे हे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात आरोग्य सेवा आणि गरजू घटकांसाठी कार्यरत आहेत.

समाजातील तळागाळातील लोकांशी असलेला त्यांचा जनसंपर्क आणि कामाची जिद्द लक्षात घेऊन संस्थेने त्यांच्याकडे सहसचिव पदाची धुरा सोपवली आहे. संस्थेची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आसबे यांची निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे.मान्यवरांकडून अभिनंदन:या निवडीबद्दल पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री. राहुल पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
“दीपक आसबे यांच्या निवडीमुळे तालुक्यात फाउंडेशनचे काम अधिक सक्षमपणे होईल,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नवनियुक्त सहसचिव दीपक आसबे यांनी आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, रुग्णांना आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.



