Homeमहाराष्ट्रराजमुद्रा फाउंडेशनच्या 'पुणे जिल्हा समन्वयक' पदी डॉ. रणजित कदम यांची निवड

राजमुद्रा फाउंडेशनच्या ‘पुणे जिल्हा समन्वयक’ पदी डॉ. रणजित कदम यांची निवड

पुणे:सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवाचे गाठोडे पाठीशी असलेले डॉ. रणजित कदम यांची ‘राजमुद्रा फाउंडेशन’ या नामांकित सामाजिक संस्थेच्या पुणे जिल्हा समन्वयक पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने पुणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोहर शिंदे व सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण निवड करण्यात आली. महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अमोल ठाकर यांच्या अनुमोदनाने आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. समाधान इंगवले यांच्या विशेष सूचनेवरून डॉ. कदम यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रदीर्घ अनुभव:डॉ. रणजित कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात अविरतपणे काम करत आहेत. गोरगरीब जनता, रुग्ण आणि समाजातील दुर्बल घटकांशी असलेला त्यांचा थेट संवाद आणि मदतीची भावना लक्षात घेऊन संस्थेने त्यांची जिल्हा समन्वयक म्हणून निवड केली आहे. पुणे जिल्ह्यातील संस्थेचे कार्य अधिक विस्तारण्यासाठी आणि गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी डॉ. कदम यांचा अनुभव मोलाचा ठरणार आहे.संस्थेचा विस्तार आणि ध्येय:”राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे मत यावेळी नवनियुक्त जिल्हा समन्वयक डॉ. रणजित कदम यांनी व्यक्त केले.

या निवडीबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि मित्रपरिवाराकडून डॉ. कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular