Homeबातमीराजमुद्रा फाउंडेशनच्या कन्नड शहर अध्यक्षपदी सौरभ बन यांची निवड

राजमुद्रा फाउंडेशनच्या कन्नड शहर अध्यक्षपदी सौरभ बन यांची निवड

संभाजीनगर | प्रतिनिधी :-सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ‘राजमुद्रा फाउंडेशन’ च्या माध्यमातून सामाजिक कार्याचा विस्तार करण्यासाठी आता कन्नड शहराची धुरा तरुण तडफदार नेतृत्व श्री. सौरभ बन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांची ‘कन्नड शहर अध्यक्ष’ पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून, या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोहर शिंदे व सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्य राज्यभर पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर, संभाजीनगर जिल्हा संघटक श्री. राहुल पुरुषोत्तम निकम यांनी सौरभ बन यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अमोल ठाकर यांनी अनुमोदन दिल्यानंतर ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

समाजहितासाठी सक्रिय होण्याचे आवाहनसौरभ बन यांचा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची ओढ लक्षात घेऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे. “राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून तळागाळातील सामान्य जनता, विद्यार्थी आणि गरजू रुग्णांसाठी आपण कन्नड शहरात जोमाने कार्य करू आणि संस्थेचे जाळे अधिक मजबूत करू,” असा विश्वास नवनियुक्त शहर अध्यक्ष सौरभ बन यांनी व्यक्त केला.

या निवडीबद्दल संस्थेचे जिल्हा संघटक राहुल निकम, प्रदेशाध्यक्ष अमोल ठाकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या निवडीचे कन्नड तालुक्यातील विविध सामाजिक स्तरातून स्वागत होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular