Homeबातमीराजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सचिवपदी युवराज श्रीमंत काळे यांची नियुक्ती

राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सचिवपदी युवराज श्रीमंत काळे यांची नियुक्ती

पंढरपूर :सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवराज श्रीमंत काळे यांची ‘राजमुद्रा फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या पंढरपूर तालुका सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे सामाजिक वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे.राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोहर शिंदे व सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अमोल ठाकर यांच्या अनुमोदनाने आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. समाधान इंगवले यांच्या विशेष सूचनेनुसार काळे यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

युवराज काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर तालुका आणि परिसरात आरोग्य सेवा तसेच गरीब व दुर्बल घटकांसाठी कार्य करत आहेत. रुग्णसेवा आणि सामाजिक प्रश्नांवरील त्यांची पकड व कामातील सातत्य लक्षात घेऊन संस्थेने त्यांची ही निवड केली आहे.

“गोरगरीब जनता आणि रुग्णांना आधार देत संस्थेची उद्दिष्टे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,” असा विश्वास नवनियुक्त सचिव युवराज काळे यांनी यावेळी व्यक्त केला.त्यांच्या या निवडीबद्दल पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री. राहुल पवार यांच्यासह तालुक्यातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular