राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे अशा सर्व महिला ऑनलाइन माझी लाडकी बहीण योजना यादीमध्ये त्यांची नावे तपासू शकतात. राज्यातील ज्या महिलांची नावे या यादीत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ऑनलाईन लाभार्थ्यांची यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल.
या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील भरावे लागतील.

सर्व तपशील भरल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे चेकिंग केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.