HomeBlogराजमुद्रा फॉउंडेशन तर्फे आरोग्य मार्गदर्शन पर शिबिराचे आयोजन

राजमुद्रा फॉउंडेशन तर्फे आरोग्य मार्गदर्शन पर शिबिराचे आयोजन

पिंपरी -चिंचवड :- राजमुद्रा फॉउंडेशन गेले दोन वर्ष सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने आरोग्य तपासणी, मंदीर स्वच्छता, गरजूंना अन्नदान, शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे विविध उपक्रम नियमितपणे घेतले जातात. संस्थेच्या दुसऱ्या वर्धापनदीना चे औचित्य साधून एक भाग म्हणून या दिवशी आरोग्य विषयक मार्गदर्शन पर शिबिर घेतले गेले.

या शिबिरात डॉ. योगिता पाटील यांनी महिलांच्या आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला तसेच महिलांसाठी ‘आजार आणि घ्यायची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे समाधान ही केले.

या कार्यक्रमास संस्थेच्या संचालक सौ. ऐश्वर्या भडगावकर -बागल व सौ. शिल्पा शिंदे यांनी महिला सबलिकरण या विषयावर मार्गदर्शन केले, या प्रसंगी अनेक महिला उपस्थित होत्या

RELATED ARTICLES

AIASL Recruitment 2025

NALCO Recruitment 2025

KDMC Recruitment 2024

Most Popular