free page hit counter

चांद्रयान-3 उद्या चंद्राच्या कक्षेत करणार प्रवेश

चांद्रयान-3 उद्या चंद्राच्या कक्षेत करणार प्रवेश

Spread the love

चांद्रयान-3 चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले; उद्या चंद्राच्या कक्षेत करणार प्रवेश

चांद्रयान-3 ने मंगळवारी मध्यरात्री 12 ते 1 वाजताच्या दरम्यान पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. यानाने पृथ्वीची कक्षा सोडल्यापासून आत्तापर्यंत दोन तृतीयांश अंतर कापले आहे.  चांद्रयान-3 चंद्राच्या आणखी जवळ पोहचले असून, ते उद्या चंद्राच्या कक्षेत जाणार असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दिली आहे.

भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेतील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून चिन्हांकित केला जात आहे. चांद्रयान-3 हे 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या प्रभावक्षेत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे हे यान अंतराळ संशोधनात महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी सज्ज असून, उद्या चांद्रयानाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा नोंदवला जाणार आहे, असेही इस्रोने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

यानंतर चांद्रयान-3 हे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. यापूर्वी ते चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणार आहे. ‘चांद्रयान-3’मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युल आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि तेथे 14 दिवस प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्युल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणार्‍या किरणोत्सर्गाचा अभ्यास करणार आहे.

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed