कन्नड:
सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असणारे व्यक्तिमत्व श्री. विकास पंढरीनाथ निकम यांची राजमुद्रा फाउंडेशनच्या कन्नड तालुका अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव आणि जनसंपर्क विचारात घेऊन संस्थेने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
राजमुद्रा फाउंडेशनचे संचालक मा. डॉ. मनोहर शिंदे व मा. सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार ही निवड करण्यात आली. या नियुक्तीसाठी महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. अमोल ठाकर यांनी सूचना केली होती, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक मा. श्री. राहुल निकम यांनी या निवडीला विशेष अनुमोदन दिले आहे
.
नवनियुक्त तालुका अध्यक्ष श्री. विकास निकम यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की, “वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला सार्थ ठरवत मी कन्नड तालुक्यात संघटनेची मजबूत बांधणी करेन. समाजातील गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून संस्थेची ध्येयधोरणे घराघरांत पोहोचवण्यावर माझा भर राहील.”


संस्थेच्या नियमांनुसार शिस्त, पारदर्शकता आणि निष्ठेने कार्य करण्याचे बंधनकारक असून, निकम यांच्या निवडीमुळे कन्नड तालुक्यात राजमुद्रा फाउंडेशनच्या कार्याला नवी गती मिळेल, असा विश्वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल विकास निकम यांच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून व कन्नड तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.
🚩 राजमुद्रा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य 🚩
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
श्री. विकास पंढरीनाथ निकम यांची राजमुद्रा फाऊंडेशनच्या ‘कन्नड तालुका अध्यक्ष’ पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
शुभेच्छुक:
मा. डॉ. मनोहर शिंदे (संचालक)
मा. सौ. शिल्पा शिंदे (संचालिका)
मा. श्री. अमोल ठाकर (महाराष्ट्र अध्यक्ष)
मा. श्री. राहुल निकम (जिल्हा संघटक)
व समस्त पदाधिकारी, राजमुद्रा फाऊंडेशन.


