Homeबातमीपिंपरी-चिंचवड महापालिकेत महिलांची रात्रपाळी बंद; नगरसेविका निकिता कदम यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी-चिंचवड महापालिकेत महिलांची रात्रपाळी बंद; नगरसेविका निकिता कदम यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेतील महिलांची नाईट शिफ्ट (रात्रपाळी) बंद करण्याचा मुद्दा आता प्रत्यक्ष अमलात आला असून, यामुळे महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.नगरसेविका निकिता ताई कदम यांनी सभागृहात महिला कर्मचाऱ्यांच्या रात्रपाळीचा प्रश्न लावून मांडला होता. महिलांना रात्रीच्या वेळी काम करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या सुरक्षेचा विचार करून ही पाळी बंद करण्याची मागणी त्यांनी केली होती.

ठळक मुद्दे: सकारात्मक निर्णय: माननीय महापौर रवी लांडगे यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून निकिता कदम यांनी मांडलेला हा मुद्दा तातडीने अमलात आणला आहे.

सुरक्षिततेचा विचार: महिलांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सुरक्षितता या दोन्ही बाबींचा विचार करून प्रशासनाने हा पाऊल उचलले आहे.

अभिनंदनाचा वर्षाव: या निर्णयाचे महापालिकेतील सर्व स्तरांतून स्वागत होत असून, महिला कर्मचाऱ्यांनी निकिता ताई कदम आणि महापौर रवी लांडगे यांचे आभार मानले आहेत. “महिलांच्या हितासाठी आणि सुरक्षिततेसाठी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून, यामुळे महापालिका प्रशासनात महिलांना अधिक चांगले कार्यसंस्कृती मिळेल,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular