Homeबातमीराजमुद्रा फाउंडेशनच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्षपदी संदीप सेठी यांची निवड

राजमुद्रा फाउंडेशनच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्षपदी संदीप सेठी यांची निवड


कन्नड / छत्रपती संभाजीनगर:
सामाजिक कार्याचा मोठा वारसा लाभलेल्या आणि जनसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या राजमुद्रा फाउंडेशनच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्षपदी श्री. संदीप विजयकुमार सेठी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आजवरच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.


राजमुद्रा फाउंडेशनचे संचालक मा. डॉ. मनोहर शिंदे व मा. सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार ही निवड करण्यात आली. महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. अमोल ठाकर यांच्या सूचनेवरून तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक मा. श्री. राहुल निकम यांच्या विशेष अनुमोदनाने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
संदीप सेठी यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्ह्यात राजमुद्रा फाउंडेशनच्या संघटनात्मक बांधणीला मोठी गती मिळणार आहे. समाजातील वंचित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणे, युवकांना संघटित करणे आणि संस्थेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष श्री. संदीप सेठी यांनी यावेळी सांगितले.


या निवडीबद्दल जिल्ह्यासह कन्नड तालुक्यातून संदीप सेठी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या कार्यात शिस्त, पारदर्शकता आणि निष्ठा राखून ते आपले कार्य प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वास संचालक मंडळ व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल राजमुद्रा फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी व जिल्ह्यातील मान्यवरांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular