सांगली (प्रतिनिधी):राजमुद्रा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संघटनेने आपल्या सांगली जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार केला असून, वाळवा तालुका समन्वयक पदी श्री. आकाश अनिल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

राजमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक-संचालक मा. डॉ. मनोहर शिंदे व मा. सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. समाधान तुकाराम इंगवले यांनी या निवडीवर शिक्कामोर्तब केले असून, महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. अमोल ठाकर यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.
जबाबदारी आणि ध्येय:नूतन तालुका समन्वयक म्हणून आकाश शिंदे यांच्यावर वाळवा तालुक्यातील संघटनात्मक बांधणी करणे, सामाजिक उपक्रम राबविणे आणि ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वय साधणे ही मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शुभेच्छांचा वर्षाव:आकाश शिंदे यांच्या निवडीबद्दल वाळवा तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे फाऊंडेशनच्या कार्याला तालुक्यात अधिक गती मिळेल, असा विश्वास पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष समाधान इंगवले यांनी व्यक्त केला आहे. आपल्या या नियुक्तीबद्दल बोलताना शिंदे यांनी, दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सर्वसामान्य जनतेपर्यंत संस्थेचे कार्य पोहोचवणार असल्याचे सांगितले.



