कन्नड (प्रतिनिधी): तालुक्यातील औराळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.बालचमूंच्या सादरीकरणाने जिंकली मनेशिवजयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात औराळी गावातील चिमुकल्या शिवकन्या आणि शिवमावळ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. पोवाडे, भाषणे आणि नाटिकांच्या माध्यमातून या बालचमूंनी शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा दिला.

महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना या मुलांच्या वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकली.सहभागी विद्यार्थ्यांचा रोख रक्कमेने सन्मानलहान मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक ‘चिटुकल्या-पिटुकल्या’ शिवभक्ताला समितीच्या वतीने रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रोत्साहनामुळे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.ग्रामस्थांची मोठी उपस्थितीया सोहळ्यासाठी औराळी गावातील नागरिक, माता-भगिनी, तरुण शिवभक्त आणि शिवकन्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण गाव शिवमय झाले असून, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
बातमी – श्री. राहुल निकम


