पुणे(15/02/2026) : सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. योगिता प्रकाश चिकणे यांची ‘राजमुद्रा फाऊंडेशन’च्या पुणे शहर महिला उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.राजमुद्रा फाऊंडेशनचे संचालक मा. डॉ. मनोहर शिंदे व मा. सौ. शिल्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा. सौ. राजश्री मोहिते यांच्या अनुमोदनाने आणि महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. अमोल ठाकर यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

योगिता चिकणे यांनी यापूर्वी विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला असून, महिला सक्षमीकरण आणि संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या अनुभवाचा फायदा संस्थेची उद्दिष्टे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी होईल, असा विश्वास राजमुद्रा फाऊंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
या निवडीबद्दल बोलताना सौ.योगिता चिकणे म्हणाल्या की, “संस्थेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरून मी पुणे शहरात महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन.”या नियुक्तीबद्दल त्यांचे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.



