free page hit counter

मिस्डकॉल द्या, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवा जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मिस्डकॉल द्या, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवा जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Spread the love

महाराष्ट्र : मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संपर्कासाठी ८६५०५६७५६७ हा नवा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस्डकॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाइलवर उपब्लध करून दिला जाणार आहे. ग्रामीण भागांसह राज्यातील इतर कानाकोपऱ्यांतून या सहायता निधीतून मदतीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत जाहीर केली जाते. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो, तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का, अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. सर्वसामान्य नागरिकांची ही शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने आता नवा उपक्रम जाहीर केला आहे. नव्या उपक्रमानुसार नागरिकांसाठी ही मिस्डकॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.इच्छुकांनी या क्रमांकावर मिस्डकॉल दिल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाइलवर येईल. त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाउनलोड होईल. या अर्जाची प्रिंट काढून तो भरून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सर्व पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली. मुख्यमंत्री सहायता निधीचे सर्वाधिक येणारे अर्ज हे कर्करोगासाठी आहेत. त्यापाठोपाठ हृदयविकार, अपघात, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, डायलिसिस, किडनी विकार या आजारांसाठी अर्ज येतात.

अन्य रुग्णांनादेखील मदत प्रथमच भाजलेल्या तसेच शॉक लागलेल्या रुग्णांचाही या निधीतील आजारांच्या यादीत समावेश केला आहे. अशा रुग्णांना या निधीतून ५० हजार रुपयांची मदत मिळते.

images-2023-12-30T223145.903-1 मिस्डकॉल द्या, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवा जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं पुन्हा सुरु केली आहे. या योजनेचा राज्यातील नागरिकांना फायदा होत आहे.

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed