पिंपरी पुणे :- पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली आहे. आज (दि.०४) सकाळी १० वाजता काळेवाडी येथील कपड्याच्या कारखान्याला आणि पेपर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या घटनेची माहिती कळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल काही वेळातच घटनास्थळी पाेहचला.