गर्भाशयाच्या पिशवीचा आजार लपवू नका, वेळीच तज्ञाचा सल्ला घ्या !
महिला आरोग्य :- महिलांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या आजार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्या मागील कारणे ही वेगवेगळे आहेत, त्यामध्ये पाळी सुरू होताना तरुणपणात आणि मेनोपॉज नंतर अशा वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात गर्भाशयाच्या पिशवीच्या समस्या तयार होतात त्यासंदर्भात काही लक्षणे दिसल्यास स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घ्यावा.
प्रमुख कारणे काय?
काहींना अशा आजारामागे अनुवंशिकता हे एक कारण असते, बहुतांश त्रास हार्मोनशी संबंधित होत असतो कोणत्याही समस्येसाठी कोणतेही एकच कारण सांगता येत नाही ज्या बायकांना एखाद्या मूल किंवा काहीच होत नाही त्यांना गर्भाशयात गाठी होण्याचे प्रमाण जास्तदिसून येते.
गर्भाशयाच्या पिशवीचे आजार कोणते?
वयाच्या विविध टप्प्यावर वेगवेगळे आजार दिसून येतात प्रजनन शीर वयोगटात म्हणजे स्त्रियांच्या मूल जन्माला घालण्याच्या ज्याला रिप्रोडक्टिव्ह एज म्हणतात त्या 20 ते 40 दरम्यान महिलांना फायबरची समस्या सर्वाधिक सतावते मेनोपॉज नंतर पिशवीच्या गर्भाशयाचा कॅन्सर कंबर दुखी असे त्रास होतात.
लक्षणे काय?
मासिक पाळीत अतिरक्तस्राव गाठी पडणे पाळी 15 ते 25 दिवस चालू राहणे पोटदुखी तरुण मुलींमध्ये पाळी अनियमित असणे वजन वाढणे आधी होय लग्न झाल्यावर मुले व्हायला समस्या होतात वंद्यत्व असू शकते गाठ असेल तर गर्भ राहत नाही
तपासणी कधी करावी?
तपासणी करण्यासाठी बायका लाजतात पाळी दरम्यान रक्तस्राव जास्त झाला गाठी पडत असतील तर तपासणी करावी सोनोग्राफी मध्ये त्याचे कारण कळते
पिशवी काढणे हा अंतिम पर्याय :- कधी कधी गर्भपिशवीचा आजार औषधे घेऊन ही बरा होत नाही अशा वेळेस अशा रुग्णाचे कुटुंब पूर्ण झाले असेल आणि गर्भाशयाची पिशवी ठेवल्याने त्याचा त्रास वाढणार असेल तर अखेरचा पर्याय म्हणून पिशवी काढतात
डॉक्टर सल्ला :- 40 वर्षावरील महिलांनी वर्षातून एकदा तरी पूर्ण मेडिकल टेस्ट करावी आणि स्त्रीरोग तज्ञ कडे जाऊन गायनॅकची तपासणी करून घ्यावी, गर्भाशय मुखाचा कॅन्सरची तपासणी करण्यासाठी पॅपस्मियर ची चाचणी करून घ्यावी.
डॉ. मनोहर शिंदे ( बी. ए.एम.एस.)
Share this content:
Post Comment